आपल्या देशाच्या संदर्भात विचार केला तर असं दिसून येते की आर्यांच्या आक्रमणापुर्वी इथे सिंधू नदीच्या खोऱ्यात एक अतिशय समृद्ध संस्कृती नांदत होती.दक्षिण भारतातही गोंड संस्कृती,नाग संस्कृती अतिशय भरात होती.परंतु आर्यांच्या आक्रमणानंतर त्यांनी आपला वैदिक धर्म इथल्या मुळ निवास्यांवर लादला.
आर्य हे अग्निपुजक होते. Arctic home in vedas मध्ये टिळकांनी म्हटल्याप्रमाणे आर्य हे उत्तर धृवीय प्रदेशातून भारतात तसेच पर्शियन राष्ट्रांमध्ये गेलेले होते.थंड प्रदेशातून आल्यामुळे अग्निपूजा हे त्यांचे नित्यकर्म झालेली होती.त्याला त्यांनी यज्ञ हे गोंडस नाव देऊन त्याद्वारे त्यांची अग्नीपूजा,मांससेवन,सोमपान ई. क्रिया चालत होत्या.
आर्य हे अतिशय शूर होते म्हणून त्यांनी भारताला जिंकले असा प्रकार नाही तर त्यांच्या विजयाला त्यांचे घोडे मोठ्या प्रमाणात कारणीभूत होते. हा प्राणी भारतीयांसाठी नवा होता न त्याच्या वेगाशी स्पर्धा करणारे साधन इथल्या शांतताप्रिय निवाश्यांकडे नव्हते.
यज्ञ हे आर्यांसाठी श्रद्धेचे आणि मौजमजेचे साधन होते परंतु ज्या भूमीवर यज्ञ करण्यात येतो ती भूमी आपल्या ताब्यात आली असे आर्य समजत.त्यामुळे अनार्य यज्ञांना विरोध करत असत. ही गोष्ट आपल्या विविध पुराणांमध्ये आणि दुरदर्शनच्या मालिकांमध्ये दाखवण्यात येते.फक्त अनार्यांच्या ठिकाणी अक्राळ विक्राळ राक्षसांना दाखवून इतिहासाचे करता येईल तेवढे विकृतीकरण केले जाते.'राक्षस' या शब्दाच्या उत्पत्तीतच आपल्या भूमीचे रक्षनण करणारे हा अर्थ स्पष्ट होतो.
हे सर्व झाले त्या काळातील परंतु आजसुद्धा भारतात शोषक आणि गुलामांचा धर्म कसा वेगवेगळा दिसून येतो याचीही अनेक उदाहरणे दिसायला लागली.
हिंदुंना सामन्यतः आपल्या सहिष्णुतेचा अतिशय अभिमान असलेला दिसून येतो. हिंदू इतर धर्मांशी भरपूर सहिष्णुतेने वागतात.ते जेवढ्या श्रद्धेने गणपतीसमोर डोकं टेकवतात तेवढ्याच श्रद्धेने एखाद्या मशिदीत किंवा चर्चमध्येही प्रार्थना करतात.पण स्वधर्मियांसोबत हिंदूंचं वर्तन कसं असतं?धर्मातील उच्चवर्णीय लोक इतर धर्मीयांसोबत भलेही संबंध ठेवतील पण आपल्याच धर्मबांधवांबद्दल त्यांना तितकिशी आपुलकी नसते. महारांनी तर त्यांना नरकसमान वाटणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माचा सन्मार्ग स्विकारला तरी सवर्ण हिंदूंच्या मनातील त्यंच्या बद्दलचा अकस अजून पुर्ण दूर झाल नाही. अजुनही अभिजनांच्या सभेत बाबासाहेबांचं नाव जरी घेतलं तर कपाळावर आठ्या पडतात,हे कशाचं द्योतक आहे? असहिष्णू असलेल्या इतर धर्मियांना भलेही अश्या पागलाची उपमा देता येईल जे दुसऱ्यांना दगडं मारतात पण हिंदुंचं काय? ते तर अश्या पागलप्रमाणे आहेत जो वेडाच्या भरत आपल्याच हात,पाय आदि अवयवांना चावत आहे. या चर्चेद्वारे मला कुठल्याही धर्माला दोष द्यायचा नाहीये,पण हिंदुंनी त्यांच्या धर्माबद्दल थोडं आत्मचिंतन करावं इतकच हेतू आहे. तो सफ़ल व्हावा इतकीच अपेक्षा!
शिवश्री
फाल्गुन व.द्वितिया! तुकाराम बीज. आजच्याच दिवशी तुकाराम महाराज सदेह वैकुंठात गेले अशी भाकडकथा आपण ऐकत आलो आहोत.तुकाराम महाराजांच्या काळात लोकांनी या गोष्टीवर विश्वास ठेवला यात त्यांची काहीच चुक नाही कारण विज्ञानाशी त्यांचा दुरुनही संबंध नव्हता.आणि मंबाजींसारखे समाजातील लब्धप्रतिष्ठीत लोक खोटं कशाला बोलतील,असाही एक समज होता. पण आजच्या काळात आपण अश्या भाकडकथांवर विश्वास ठेवणे म्हणजे या विज्ञान युगाचा अपमान करणे होय. तुकाराम महाराजांचा धुळवडीच्या दिवशी खून झाला होता,मंबाजी व त्याच्या काही साथीदारांनी त्यांचे प्रेतही सापडू नये अशी व्यवस्था केली होती.पण महाराज गेले कोठे या प्रश्नाला काहीतरी उत्तर शोधणे भाग होते , त्यातूनच या भाकडकथेचा जन्म झाला.यातून त्यांचा दुहेरी फायदा झाला.तात्कालिक फायदा असा की खून पचला आणि त्यापेक्षाही मोठा दिर्घकालीन फायदा असा झाला की त्यांना त्या तुकारामालाही मारता आले जो त्यांच्या विचारांमध्ये जिवंत राहू शकला असता. सदेह वैकुंठगमणाच्या घटनेने तुकारामांची प्रतिमा चमत्कारी बाबांची झाली आणी तेव्हाच त्यांचा खरा मृत्यू झाला. समकालीन धुर्त लोक महान लोकांना अशाच रितीने मारण्याचा प्रयत्न करतात.आधी तर ते त्या व्यक्तीकडे लक्षच देत नाहीत,पण जेव्हा ती व्यक्ती इतकी मोठी होते की तिच्याकडे दुर्लक्ष करणं अशक्य ठरते तेव्हा ते त्या व्यक्तीवर टिकेची झोड उठवतात,त्याला परोपरीने बदनाम करण्याचा प्रयत्न करतात.(तुकाराम महाराजांकडे वेश्येला पाठवण्याचा प्रकारही याच गटात येतो.)अन् जेव्हा त्या व्यक्तीला बदनाम करणेही अशक्य होते तेव्हा ते त्या व्यक्तीचा जाहीर उदोउदो करून पद्धतशीर तिच्या विचारांना मारतात.म्हणजे ती व्यक्ती फक्त नावाला अमर होते अन् ज्या गोष्टीसाठी त्या व्यक्तीनं जन्मभर जीव जाळला ती गोष्ट तशीच राहते.
महाराष्ट्रात काही कुटील लोक व राजकारण्यांनी शिवजयंतीचा वद्कायम चिघळता ठेवल आहे.आजही शिवरायांच्या महाराष्ट्रात त्यांच्या २-२ जयंत्या साजऱ्या केल्या जाव्यात यासारखा शिवरायांचा दुसरा अपमान तो कोणता? (याशिवाय महाराष्ट्रात शिवजयंती टिळकांनी सुरू केली असाही एक गोड गैरसमज आहे.पण टिळक जेव्हा खरोखरच बाळ होते तेव्हा १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडावरील शिवरायंची समाधी शोधून काढली व शिवरायांच्या जिवनावर एक प्रदिर्घ पोवाडा रचला. शिवरायांचे कार्य घरोघर पोहचावे यासाठी त्यांनी १८७० साली शिवजयंती सुरू केली. शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुण्यात पार पडला. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या उत्साहात सुरू झाली.) असो, सध्याचा प्रश्न शिवजयंतीच्या वादाचा आहे.हा वाद संपाव म्हणून महाराष्ट्र शासनाने १९६६-६७ साली वा. सी. बेंद्रे, न. र. फाटक, ग. ह.खरे, द. वा. पोतदार, डॉ. अप्पासाहेब पवार, ब.मो.पुरंदरे यांची एक समीती स्थापन केली. शिवजयंतीची तारीख निश्चित करण्याचे काम या समितीकडे सोपवण्यात आले. ज्या कामाला २-३ वर्ष लागतात तेथे त्यांनी ३०-३३ वर्ष लागले, म्हणजेच हा वेळकाढूपणा होता. शेवटी त्यांनी १९ फ़ेब्रुवारी १६३० ही तारिख शासनाल सादर केली. १९ फ़ेब्रुवारी ही तारिख जाहीर झाल्याबरोबर कालनिर्णय कॅलेंडरवाले जयंत साळगांवकर यांनी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करावी असे आवाहन केले.त्यासाठी वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या.त्यांनी तिथीचा आग्रह धरतच पुरंदरे, बेडेकर, मेहेंदळे यांनी तिथी समर्थनार्थ साळगांवकरांना पत्रे दिली. शासनाच्या समितीत असणारे तथाकथीत शिवशाहीर तिथीच्या कळपात घुसले. शिवजयंतीचा वाद हा कोणत्याही राजकीय पक्षाने सुरू केला नाही, पण हा वाद सर्वत्र व्हावा यासाठी त्या नंतर राजकीय स्वरूप देण्यात आले. यामागे षड् यंत्र काय? या वादतून बहुजन समाजात दोन गट पडावेत, लढण्यातच त्यांची सर्व शक्ती नष्ट व्हावी, खऱ्या शिवचरित्राकडे त्यांचे लक्षच जाऊ नये असा हेतू नसू शकेल काय? जयंत साळगांवकरांना तिथीबद्दल एवढे प्रेम आहे तर मग ते आपले कॅलेंडर चैत्र महिण्यात बाजारात का आणत नाहीत? कॅलेंडरमध्ये तारखेचे आकडे मोठे आणि तिथीचे आकडे लहान का टकतात? पण तिथीचा आग्रह धरल की पंचांग आलेच , मग़ साळ्गांवकरांसारख्यांचा रोजगार हमी धंदा आलाच . पंचांग वाचनाचा बिन भांडवली धंदा चालावा आणि खरे शिवभक्त वादातच संपावेत यासाठीच हे कारस्थान आहे. बहुजनांनी शिवजयंतीच्या वादचे हे मूळ जाणून आपसातील सर्व मतभेद विसरून सर्वांनी १९ फ़ेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करावी याचसाठी हा खटाटोप ! जय जिजाऊ ! जय शिवराय ! शिवश्री